गुरु शुक्राचार्य महाराजांवर लिहिलेल्या शुक्र तीर्थ या मराठी व इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन रविवारी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील श्री क्षेत्र बेट येथील जगप्रसिद्ध असलेले परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची माहिती व महती सांगणारे व मंदिरावर आधारित परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड यांनी लिखित शुक्र तीर्थ या मराठी पुस्तकाचे व SHUKRA THRTHA या इंग्रजी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन उद्या रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 09.30 वाजता घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव मतदार संघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज व श्री राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती गुरुवर्य श्री श्री महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद लाभणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तर मुंबई येथील गुरु शुक्राचार्य महाराजांचे भक्त विशाल दोशी हे उपस्थित राहणार आहे तरी आपण सदर कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहून परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या आशिर्वादास प्राप्त व्हावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व ट्रस्ट कमिटीचे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *