शिर्डी येथील रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- दि. 13/10/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी येथील नगर-मनमाड रोडचे बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे आणि अमोल भीमा भोसले रा.श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून स्पा सेंटर चालक गणेश कानडे हा फरार झालेला आहे. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI सोपान शिरसाठ,API योगिता कोकाटे, HC इरफान शेख, PN अशोक शिंदे,PN बाबा खेडकर , LPN वंदना वाकचौरे,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *