आर जे एस आयुर्वेद महाविद्यालयात आरोग्य विज्ञान मुलभूत तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- .राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेद महाविद्यालय येथे आरोग्य विज्ञान मुलभूत तंत्रज्ञान कार्यशाळा (एच.एस. ई.टी) या तीन दिवसीय कार्यशाळेचे दि. ३/१०/२०१३ ते दि. ५/१०/२०२३ या काळात आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ग्रुप ऑफ फाउंडेशनचे संस्थापक चांगदेव कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आर जे एस आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नारायण पाटील व डॉ.शितल अंतापुरकर यांच्या हस्ते व. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पुजन व दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेद क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर डॉ.शितल अंतापुरकर, डॉ.योगेश सुरसे,डॉ.कविता पाटील डॉ.प्रितम पावळे,डॉ.ज्योती गवळी, डॉ.योगेशकुमार गीते या नामवंत डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयातील व महाराष्ट्रातील इतर नामांकीत महाविद्यालयातील एकुण ३० डॉक्टर्स सहभागी झाले होते.सदर कार्यशाळेच्या निरोप समारोहा करता आयुर्वेद विभाग आरोग्य विज्ञान विद्यापिठ अधिष्ठाता डॉ.मिलींद आवारे, विजय कडु, दिपक कोटमे, आर.जे.एस.संस्थेचे संस्थापक चांगदेव कातकडे.संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे, प्राचार्य नारायण पाटील व इतर मान्यवर उपस्थीत होते. सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. सुनील धोंगडे उपस्थीत होते.

फोटो ओळी
आर जे एस आयुर्वेद महाविद्यालयात आरोग्य विज्ञान मुलभूत तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभागी झालेले मान्यवर दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *