सर्दी,खोकल्याची औषधें मुबलक उपलब्ध करून द्यावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव व परिसरात यावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्दी खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ होणार असून आरोग्य विभागाने या वरील औषधें त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यात करोना बाधित पेशंट च्या संख्येत दिवसेंदिवस धक्कादायक वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच भर म्हणून यावेळी पावसाने कोपरगाव शहर व तालुक्यात हजेरी लावली आहे दिवसभर उन्हाचा कडाका आणि त्यात पावसाची हजेरी यामुळे वातावरणात मोठा बदल झालेला आहे या बळलेल्या वातावरणामुळे सर्दी खोकला आदी आजार होण्याची शक्यता वाढली आहे ही सर्व कोविड आजाराची लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन विनाकारण नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे
तालुका ग्रामीण रुग्णालय व शहर आरोग्य रुग्णालय या ठिकाणी पुरविण्यात येणारी सर्दी खोकल्याची औषधें परिणाम कारक आहेत मात्र हवामान बदला मुळे ही साथ विचारात घेता तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच शहर व ग्रामीण रुग्णालयात सर्दी खोकला यावरील औषधें मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास प्रशासनावर ताण जाणवणार नाही तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहणार नाही असेही या पत्रकात म्हटले आहे.
लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के राजू रोकडे किरण अढांगळे, सुजल चंदनशिव ,गोपिनाथ ताते,पप्पू वीर, दत्तू खैरनार,घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, विशाल आव्हाड, बाबा ससाणे व्यापारी समितीचे अकबर शेख,निसार शेख,अजय विघे, सागर आहेर यांनी ही मागणी केली आहे.
