पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांची एकाच हपत्यातील पाचवी महत्त्वपूर्ण कामगिरी शहर पोलिस स्टेशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- घरफोडी,

सात दुकान फोडणारा चोर मुद्देमाल सह गजाआड,

२ मोटारसायकल चोर अटकेत,


महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणार्या दोन महिला चोरट्यांना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी स्वतः पाठलाग करुन पकडले हि चौथी व


कोपरगाव शहरातील बेपत्ता झालेल्या ३ अल्पवयीन बहिणींचा अवघ्या सात ते आठ तासात रात्र डोक्यावर घेत कोपरगाव शहर पोलिसांनी शोध लावला असून या तीनही मुलींना रांजणगाव परिसर पुणे येथून सुखरूप परत आणून या मुलींना सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे . पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव शहरातील यशवंत चौक कहार गल्ली येथील अल्पवयीन तीन मुली शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या आई वडिलांना कामा वरून घरी आल्यावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घरातील व्यक्तींनी शिर्डी कोपरगाव रेल्वे स्टेशन शहरातील सर्व परिसरात या तीन मुलींचा शोध सुरू केला मात्र यश आले नाही त्यानंतर घरातील व्यक्तींनी तात्काळ कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आपल्या तीनही मुली बेपत्ता झाल्याची सर्व हकीकत मुलीच्या आईने पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना सांगितली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी क्षणाचा विलंब न करता तीन बहिनींपैकी मोठ्या बहिणीच्या मोबाईलच्या लोकेशन द्वारे तपास सुरू केला जस जसे लोकेशन मिळत गेले त्या दिशेने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली या मुली रांजणगाव परिसर पुणे येथे असल्याचे कळताच त्यांनी रात्रीच ३ वाजता पुणे येथे जाण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर यांच्यासह तेथील स्थानिक अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले असता त्या मुली सकाळी अंदाजे ९:३० ते १० च्या दरम्यान कोरेगाव पार्क येथे मिळून आल्या त्यांना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस बाबा कोरेकर त्यांचे सहकारी कोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन या तीनही मुलींना ताब्यात घेवुन कोपरगाव येथे आणून त्यांच्या आई वडिलांना व मुलींना समज देत आई वडिलांच्या स्वाधिन केले आहे .


पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या मुलींच्या आई वडिलांनी व स्थानिक रहिवाशांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पो . हे . कॉ . बाबा कोरेकर , महिला पो.कॉ. मनिषा त्रिभुवन व सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करत आभार मानले .
यावेळी सहकार्य लाभलेले पोलिस पी.एस.आय भरतजी नागरे, सहाय्यक फौजदार शैलेंद्रजी ससाणे,
पो.को.सुरेश अग्रवाल, पो.को.संभाजी शिंदे, पो.को.गणेश मैड, पो.को.राम खारतोडे, पो.को.रमेश जगधने, पो.को.शिवाजी साठे, पो.को.सचिन शेवाळे,
पो.को.मंजुश्री त्रिभुवन, पो.को.प्रिती बनकर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *