
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात येवला रोड लगत असलेल्या पशु वैद्यक दवाखान्याच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले असून पशु वैद्यक दवाखाना प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ते त्वरित बुजवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे पशु वैदयक दवाखान्या साठी माजी आमदार अशोक काळे साहेब यांनी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणला या जागेवर सुसज्ज अशी पशु वैद्यक दवाखान्याची इमारत उभी करण्यात आली त्यास दहा फूट उंचीची भिंत बांधून वॉल कंपाउंड बांधण्यात आले या जागेवर सुरू असलेले अवैध धंदे व त्या धंद्यासाठी केलेले अतिक्रमणे उध्वस्त करण्यासाठी महसूल प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झाले
आता या पशु वैद्यक दवाखान्याच्या सर्व बाजूने भिंत बांधली असून गेल्या काही दिवसांपूर्वी या भिंतीला मोठे भगदाड पाडले आहे ते कोणी व का पडले या बाबत पशु वैद्यक प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी पूर्वी अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते हे सर्वश्रुत आहे असे असताना हा भिंतीचे भगदाड बुजवण्या साठी दुर्लक्ष होणे म्हणजे पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ शकते त्याच प्रमाणे या जागेत अवैध धंद्यांना निमंत्रण मिळू शकते त्या मुळे या भिंतीला पडलेले भगदाड त्वरित बुजवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे
या पत्रकावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के, किरण अढांगळे,सुजल चंदनशिव,दत्तू खैरनार, प्रवीण शेलार, गोपीनाथ ताते सामाजिक कार्यकर्ते अकबर पटेल, निसार शेख आदींनी केली आहे.
