
कोपरगाव प्रतिनिधी:-
मुले म्हणजे देवाघरची फुले! रीती -रिवाजानुसार अनेक सण शाळेमध्ये साजरे केले जातात. त्यातलाच मुलांचा आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर बेट भागातील नगरपालिका शाळा नंबर ५ मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम रंगला होता. मुले मुली श्रीकृष्ण व गोपिकांच्या पेहेरावात शाळेत आली होती. कोणी राधा बनले होते तर कोणी श्रीकृष्ण. सजवलेल्या दहीहंडीमध्ये लाह्या, दही व चॉकलेट भरण्यात आले होते. एका थराच्या या दहीहंडीचा विद्यार्थ्यांनी खूपच आनंद लुटला. वाढदिवस असलेल्या श्रेयांश याने श्रीकृष्णाच्या पेहरावात दहीहंडी फोडली. सर्व विद्यार्थी फोडलेल्या दहीहंडीतून पडलेला प्रसाद व खापराचे तुकडे गोळा करण्यात मजा घेत होते. याप्रसंगी श्रीकृष्ण कथा ऐकविण्यात आली, तसेच दहीहंडी संबंधित गाण्यांवर मुलांनी ठेका धरला होता. या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम गगे,सुवर्णा मतकर,कावेरी शिंदे,कविता विनोद नाईकवाडे ,काळे ताई, सीमा कुलकर्णी ,सखुबाई पवार ,सीमा रक्ताटे, शीतल शितोळे, रोहिणी गायकवाड, कावेरी गहिरे, रेखा परदेशी, सोमनाथ लकारे,रवींद्र शिंदे, संतोष मतकर,कविता सोनवणे,रत्ना ढाकणे हे पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विलास माळी, सुनिल रहाणे, नसरीन इनामदार व अमोल कडू या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
