चासनळी येथील के. बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे, के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी ,येथे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री. एन. जी. बारे सर यांनी आपल्या मनोगता मधून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितले की, “आजच्या काळातील विद्यार्थ्यांची शिस्त ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, त्यामुळे भविष्याची पावलं ओळखून विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त बाळगावी आणि गुरुदक्षिणा म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त करावे. ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.”


आपल्या प्रस्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढेकळे सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व विद्यार्थ्यांनी शिक्षकांमधील चांगले गुण घेऊन आपले जीवन सुंदर बनवावे असे यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक दिनाचे औचित्य साधत नवोदित शिक्षकांनी आपले शिक्षक बनण्याची स्वप्न साकार केले. यामध्ये वैभव सापनर, गोकर्ण वाघ ,कोकाटे नमन ,अवधूत गाडे, धनराव सिद्धेश, बरकले अभिजीत, मयूर सरोदे, जाधव संदेश, युवराज गाडे ,धनराव अभिषेक, वाघ प्रतीक, कु .जगताप कावेरी, शिंदे अश्विनी, आढाव साक्षी, आहेर विद्या, श्रेया नाजगड, श्रुती आढाव, पायल मांजरे ,बोडखे वैष्णवी, सानप ऋतुजा, चांदगुडे सृष्टी, श्रावणी चांदगुडे तिरसे तृप्ती, गावंड धनश्री आदी विद्यार्थी शिक्षक दिनी शिक्षक बनले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी चांदगुडे व प्रणाली चांदगुडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार ईश्वरी गाढे या विद्यार्थिनीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *