
ग्रामिण विध्यार्थी नोकरदार बनविण्यासाठी संजीवनीची यशस्वी वाटचाल...
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपरर्टमेंटच्या पुढाकराने हेक्सावेयर टेक्नाॅलाॅजी व डेलाईट्टे या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभर कार्य असलेल्या कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात एकुण १५ नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नातुन ग्रामिण विध्यार्थ्यांना नोकरदार बनविण्यासाठी चांगले यश मिळत असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगीतले आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की वरील दोनही कंपन्या या जरी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असल्या तरी संजीवनीतुन विध्यार्थ्यांना इंटर डिसीप्लिनरी एज्युकेशन दिल्या जात असल्यामुळे या कंपन्यांनी सर्वच अभियांत्रिकी शाखांमधील विध्यार्थ्यांची निवड केली आहे. यात हेक्सावेयर टेक्नाॅलाॅजी या कंपनीने आदित्य प्रभाकर धोत्रे, यश अँथोनी दिवे, ओम अरविंद काळे, अक्षदा भागवत पानगव्हाणे, ओमकार राजेंद्र भागवत, सोमेश पुष्कराज केवारे, ज्ञानेश्वरी मच्छिंद्र चौधरी , वैष्णवी जालिंदर तुरकणे व रितेश सुभाष दिघे यांची निवड केली आहे. डेलोईट्टे या कंपनीने वैष्णवी नवनीत जोशी , सोहम बाबासाहेब सुर्यवंशी , आशुतोष सुनिल गोरे, श्वेता शेखर चौधरी , प्रांजली राजेंद्र पवार, सुमेधा संजय सम्रित व असिफ रशीद शेख यांची नविड केली आहे.
हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या हातात संजीवनीच्या प्रयत्नातुन नोकरीचे नेमणुक पत्र दिल्या गेले आहे. कंपन्यांन्या अपेक्षित तांत्रिक ज्ञान प्राप्त अभियंते संजीवनी मधुन मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात विविध नामांकित कंपन्याच्या कसोट्या येथिल विध्यार्थी पुर्ण करीत असल्याचे श्री कोल्हे यांनी सांगीतले.
विध्यार्थ्यांच्या निवडी बध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विध्यार्थी, त्यांचे पालक व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर यांचे अभिनंदन केले आहे. विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘माझे वडील बाभळेश्वर येथे शेती करतात. मला मुलाखतीच्या तयारीसाठी संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून खुप मार्गदर्शन मिळाले. या विभागाच्या मार्गदर्शनानुसार तयारी केली तर नोकरी हमखास मिळते, हा संजीवनी मधिल माझा अनुभव आहे.’ -प्रांजली पवार
‘मी राहुरी तालुक्यातील धानोरे या छोट्या गावचा रहिवासी. माझे वडील शेती करतात. मी संगणकिय क्षेत्राचा विध्यार्थी नव्हतो, परंतु शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या संगणकिय भाषा शिकलो , शिक्षकांनी माझ्याकडून भरपुर सराव करून घेतला आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच मी मुलाखतीला यशस्वीरित्या सामोरे जावु शकलो आणि माझी नोकरीसाठी निवड झाली.’- रितेश दिघे.
