एस. एस. जी. एम. मधील विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- ५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती व आदर्श शिक्षक, विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने व मोठ्या उत्साहात हा शिक्षक दिन साजरा केला. हा दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी पहिल्या चार तासांमध्ये अध्यापनाचे नियोजन केले होते. यात शेखआसिफ,मगर नीलम,चव्हाण गौरी,शिंगाडे विशाखा,वाबळे शुभांगी,निकोले मयूर या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे अध्यापन करून अध्यापनाचा अनुभव घेतला. अध्यापनादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून बोलते केले. काहींना अध्यापनादरम्यान गमती जमतीही अनुभवायला मिळाल्या. याचाही आनंद अध्यापक झालेले शिक्षक व विद्यार्थी यांनी घेतला. याबद्दलच्या प्रतिक्रिया नंतरच्या झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. आज समाजात शिक्षकांविषयीचा आदर व आस्था कमी होत चालली असली तरी, शिक्षकाचे काम किती महत्त्वाचे व जीकीरीचे आहे, हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर यांनी भूषविले.


याप्रसंगी प्रा.डॉ.मोहन सांगळे, प्रा.ए.के.देशमुख, प्रा. डॉ. बाबासाहेब वर्पे, प्रा.डॉ.उज्ज्वला भोर,प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे, प्रा.डॉ.वैशाली सुपेकर यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा.रणधीर यांनी, बदलत्या समाज परिस्थितीकडे लक्ष वेधून शिक्षकाच़्या वाढत्या जबाबदारी विषयीचे विचार व्यक्त केले.प्रमुख उपस्थिती लाभलेले प्रा. मोहन सांगळे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या महान कार्याची माहिती देऊन शिक्षकाचे महत्त्व लक्षात आणून दिले. प्रा.वर्पे व प्रा.देशमुख यांनी,बदलत्या परिस्थितीतही शिक्षण व शिक्षकाचे महत्व लोप पावणारे नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर ठेवावा,असे आवाहन केले. प्रा. उज्ज्वला भोर यांनी शिक्षक हा एखाद्या शिल्पकारासारखा असतो. मात्र त्याच्या समोरील शिल्परुपी विद्यार्थीही तशाच क्षमतेचे हवेत, असे सांगून विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ व फलदायी होण्यासाठी करावा. दुरुपयोग करून शिक्षक- विद्यार्थ्यांतील पवित्र व खेळता संवाद थांबविण्यासाठी करू नये, असे आवाहन केले.प्रा.शेंडगे यांनी सांगितले की, कुठलाही विकास करताना काही हात हातात,काही पाठीवर तर काही मस्तकावर असावे लागतात. शिक्षकांच्या कृपादृष्टीमुळेच माझ्यासारखी व्यक्तिमत्व घडली आहेत.प्रा.सुपेकर यांनी,महान भारतातील विद्यार्थीही तितकेच भाग्यवान असल्याचे सांगितले.तसेच,विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने,उत्साहाने शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
विद्यार्थी मनोगतात कला विभागातील वैशाली घोटेकर , आदिती घोटेकर, आकाश चीरायत, पूजा खटकाळे, बी.बी.ए. विभागातील सानिका पांगारकर,श्रेयस ठाणगे., विज्ञान विभागातील डगले शुभम,वाणिज्य विभागातील- बावीस्कर अभिजीत, भाटे भगवान, मगर निलम,संवत्सरकर प्रतीक्षा,विसपुते नुपूर,कला विभागातील वैशाली घोटेकर, या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनात आदिती घोटेकर, आकाश चीरायत,श्रद्धा लोखंडे, सानिका पांगारकर,आदित्य वाणी,श्रेयस ठाणगे,दर्शन जैन,सिद्धार्थ गोरक्ष यांनी विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम घडवून आणला.त्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांची प्रेरणा आणि डॉ.माधव यशवंत,डॉ.प्रतिभा रांधवणे, प्रा.प्रियंका काशीद,प्रा.दिलीप भोये, प्रा.निलेश साळवे,मोहित गवारे, चैताली गांधी,नितीन साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – संकेत शिंदे, कल्याणी कोपरे,अदिती घोटेकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा.दिलीप भोये व प्रा.नितीन साळवे यांनी मानले.
उत्साहवर्धक व प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक,कार्यालयीन अधीक्षक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *