
कोपरगाव प्रतिनिधी:-
संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन(कार्यक्षेत्र संपूर्ण भारत)स॑स्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
श्री.दत्ताभाऊ कदम,महाराष्ट्र राज्य प्रदेश सह सचिव श्री.रविंद्र खामकर व महिला प्रदेश अध्यक्ष सौ.सुप्रियाताई आंबेतकर यांच्या आदेशानुसार
मा.सौ.सुनीताताई नवनाथ पाचोरे
यांची संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) कोपरगाव तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सत्कार श्री संत सावता माळी महिला आघाडी महाराष्ट्र राज्य कोपरगाव कार्यअध्यक्ष सौ.छायाताई मुकुंदमामा काळे व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल तसेच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य वतीने सत्कार करण्यात आला सत्कार करताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक श्री.ज्ञानेश्वर बापु परजणे,संजीवनी पत संस्था कोपरगाव संचालक श्री.राजेंद्र परजणे,विद्यमान संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश परजणे,भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे,श्री.दीलीप कासार,श्री.दीनेश बोरनारे,श्री.नवनाथ पाचोरे,श्री.अनिल शिंदे आधी ऊपस्थित होते.

सौ.सुनीताताई पाचोरे यांचे महिला बचत गट चालविण्यात मोठे कार्य असून महिलांचे संघटन करून त्यांना रोजगारासाठी बचत गट चळवळीत सहभाग घेण्यासाठी सौ.पाचोरे या नेहमी प्रयत्नशील असतात.त्यांना पुढील कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्या हातून अशीच समाज सेवा घडत राहो अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.
