वाहतूक पोलीस संजय भालेराव यांना सापडली बेवारस निराधार मनोरुग्ण महिला त्यांनी तिला साईआश्रयात दाखल केले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-
निराधार मनोरुग्ण महिला – स्वाती हारे ही महिला मनोरुग्ण असून दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 8 वा.शिर्डी पोलीस स्टेशन येथील वाहतूक पोलीस संजय भालेराव यांना बेवारस भटकंती करत असताना सापडली तिला स्वतःचे नाव गाव काही सांगता येत नव्हते मनोरुग्ण असल्याने घरातून न सांगता निघून आली असावी असा पोलिसांचा अंदाज होता तेव्हा तिचा कुठलाही प्रकारचा घरचा पत्ता सापडत नसल्याने शिर्डी पोलिसांनी रात्री अकरा वाजता साईअश्रया येथे कळवले तेव्हा आम्ही 11.30 वाजता शिर्डी पोलीस स्टेशन येथे पोहोचलो सदर महिलेला काहीही सांगता येत नव्हते व त्यावेळी तिच्याजवळ एक छोटीशी बाहुली होती ती फक्त बाहुलीला प्रेमाने जवळ घेत होती

अशा परिस्थितीत तिला आश्रयाची खूप गरज होती तेव्हा नातेवाईक मिळेपर्यंत शिर्डी पोलिसांनी साईआश्रयात दाखल करण्यास सांगितले तेव्हा या महिलेला साईआश्रय देण्यात आला रात्री 12 वाजता आम्ही साईआश्रयात पोहोचलो तेव्हा तिला सर्वप्रथम भोजन देण्यात आले यानंतर तिला साईआश्रयातील महिलांसोबत राहण्याची व्यवस्था करण्यात आली दुसऱ्या दिवशी तिला साईआश्रयातील आईने प्रेमाने विचारपूस केली तेव्हा जालना असे सांगत होती यानंतर या महिलेचा फोटो शिर्डी पोलिसांनी जालना या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात आला तेव्हा तीचे नातेवाईक मिळून आले व मला त्यांचा फोन आला ही महिला आमच्या कुटुंबातील असून गेल्या 8 दिवसापासून ती बेपत्ता आहे तेव्हा आम्ही तिला घेण्यास येत आहोत आम्ही त्यांना सांगितले की तुमची महिला ही शिर्डी येथील साईअश्रया येथे सुखरूप आहे आपण तिला घेण्यास यावे तेव्हा तिच्या कुटुंबातील तिचे पती भिमराव रामचंद्र व वडील बाबुराव नारायण पानगे हे आले तेव्हा शिर्डी पोलिसांनी योग्य कायदेशीर कार्यवाही करून तिला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले

अशाप्रकारे पुन्हा एकदा शिर्डी पोलीस स्टेशन व साईअश्रया परिवार यांनी माणुसकी जपली. साईराम साई सेवक -गणेश दळवी.
मो नं. 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *