
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.३१ जानेवारी पोलिओ रविवार. सदर दिवशी ०ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना संपूर्ण भारतात पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. नजिकच्या प्रा. आ. केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बुथवर सदर डोस सकाळी ८ ते ५ या वेळेत पाजणेत येनार आहेत.
कोपरगाव तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील ३२०१७ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. २८१ पोलिओ बुथवर ५७९ कर्मचार्यांमार्फत हे डोस देण्यात येणार आहेत. यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, ए एन एम ,एम पी डब्ल्यू, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग असणार आहे.

सर्व जनतेने आपल्या घरातील, आलेल्या पाहुण्यांची , शेजारील, नविन जन्म झालेल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलिओ डोस पाजनेचे आरोग्य विभाग पं. समिती कोपरगाव यांचेतर्फे आव्हान करण्यात येत आहे. आपल्या बाळाला अपंगत्वापासुन वाचवनेसाठी पोलिओ डोस जरुर पाजा.

डाॅ. संतोष विधाते
तालुका आरोग्य अधिकारी
पं. समिती कोपरगाव.
