लायन्स व लिओ क्लब कडून स्वातंत्र्य उत्सव जल्लोषात साजरा….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
लायन्स व लिओ क्लब कडून स्वातंत्र्य उत्सव जल्लोषात साजरा
76 व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्यामार्फत व लाईन सत्यम मुंदडा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला एक शाम देश के नाम हा कार्यक्रम 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी कोपरगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शांताराम जी गोसावी मुख्याधिकारी कोपरगाव, नगरपरिषद.तसेच तालुका शिक्षण अधिकारी श्री सोनवणे साहेब यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत, डान्स, देशभक्तीवर भाषण व मनोगते असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सांगता लायन्स, लिओ आणि परिसरातील नागरिक यांनी मिळून एक मोठ्या मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाचे रक्षण करीत असताना वीरगती प्राप्त झालेल्या कोपरगाव परिसरातील जवानांच्या कुटुंबियांना चांदीचे मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच कोपरगाव तालुक्यातील 50 पेक्षा अधिक माजी सैनिकांना सहकुटुंब बोलवून त्यांचा देखील गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक राष्ट्रगीत आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी लायन शैलेंद्र बनसोडे सर, लायन धनंजय शिरसागर सर, लायन राम थोरे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे आभार लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी लायन्स आणि लिओ परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *