
कोपरगाव प्रतिनिधी
(चासनळी):- दि.15.8.2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला.
ध्वजारोहण प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सुनिता बनसोडे यांच्या हस्ते केले.यानंतर संगीत कवायत व विद्यार्थी भाषणे झाली. सर्वांनी निपुण प्रतिज्ञा घेतली.गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद निवृत्ती पवार यांनी शाळेला ६० रायटिंग टॅब तसेच एक सीपीयू व कीबोर्ड भेट दिला. ग्रामस्थांनी शाळेसाठी खाऊ शालेय साहित्य व रोख रक्कम दिली. कै.गणपतराव दगडुजी तिडके यांच्या स्मरणार्थ श्री.नितीनराव गणपत तिडके यांच्या १६,००० रू ठेवीतून व आपल्या मातोश्री कै. सुगंधाबाई चांदगुडे यांच्या स्मरणार्थ श्री.कृष्णा चांदगुडे यांच्या १५,००० रुपये ठेवीतून गुणवंत मुलांचा सत्कार करून बक्षीस वाटप करण्यात आले.शाळेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मायभूमी सोशल फाउंडेशन चासनळी यांनी सर्व मुलांना वह्या, पेन व पेन्सिल हे शालेय साहित्य दिले तसेच कार्यक्रम संपल्यानंतर मायभूमी सोशल फाउंडेशन सदस्य बबन गाडे,कैलास चांदगुडे,शिवाजी चांदगुडे,संतोष पऱ्हे, सागर शिंदे, शरद पवार,सुकदेव माळी,भारत जेजुरकर,संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ करून दिला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत माळी सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक श्री.राजेंद्र गायकवाड यांनी तसेच सूत्रसंचलन श्री.संतोष पारासुर यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्री.सिताराम कचरे श्री.भीमा गोडे सर, श्रीम.जयश्री मोगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार श्री.मिननाथ माळी यांनी व्यक्त केले.
