


कोपरगाव प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड पुणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व गुरू शुक्राचार्य भक्त संजय रॉय आणि फॅमिली महाराज्यांच्या दर्शना . साठी मंदिरात आले असता त्यांनी गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात असलेल्या शिव पिंडी ला बसवण्यात येणाऱ्या चांदीच्या अवरणा साठी आपल्या तर्फे एक किलो ( १ किलो ) चांदी भेट म्हणून दिली .


त्याच वेळी मंदिरात दर्शनासाठी आलेले गुरू शुक्राचार्य भक्त व मराठी फिल्म इंडस्ट्री तील प्रसिद्ध कलाकार , निर्माते व दिग्दर्शक श्री चिन्मय उदगीरकर यांचे हस्ते श्री संजय रॉय व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला . श्री रॉय यांनी अर्पण केलेली एक किलो चांदी शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या कडे सुपूर्त केली . या प्रसंगी ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , अभिनेता चिन्मय उदगीरकर , श्री संजय रॉय फॅमिली , श्री आदिनाथ ढाकणे , श्री अरविंद औताडे , मंदिर पुजारी जोशी व भ नगे , व्यवस्थापक श्री राजाराम पावरा इत्यादी उपस्थित होते .
