संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे लागोपाठ यश...
कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट तसेच विविध विभागचे विभाग प्रमुख, डायरेक्टर यांनी आपल्या सर्वच विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये कशा नोकऱ्या मिळवुन देता येईल याचा ध्यास घेतला असुन त्यांच्या प्रयत्नांना लागोपाठ चांगले यश मिळत आहे. जोश साॅफ्टवेअर, अप्लाईड एआय कन्सल्टिंग एलएलपी, एनटीटी डेटा, आय ब्रेन व एमिनन्स इक्विपमेंटस् प्रा. लि. या कंपन्यांनी संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अण्ड पी) विभागाच्या पुढाकाराने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे निकाल जाहिर केले असुन नवोदित अभियंत्यांना वार्षिक पॅकेज रू २. ४ लाख ते रू ५ लाख देवुन नेमणुक पत्रेही दिले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की जोश साॅफ्टवेअर या कंपनीने सोेहम चंद्रकांत क्षिरसागर, श्रेयश दिपक खळेकर यांची वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर निवड केली आहे. अप्लाईड एआय कन्सल्टिंग एलएलपी कंपनीने प्रथमेश संदेश भोगळे याची रू ५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. एनटीटी डेटा कंपनीने सिध्दार्थ भाऊसाहेब आहेर याची वार्षिक पॅकेज रू ४. २ लाख देवु करून निवड केली आहे. एमिनन्स इक्विपमेंटस् प्रा. लि. याकंपनीने प्रशांत ज्ञानदेव कदम व ओमकार राजेंद्र महांकाळ यांची वार्षिक पॅकेज रु ३ लाखांवर निवड केली आहे. आय ब्रेन कंपनीने प्रथमेश नारायण एकशिंगे व प्रिया सदाशिव भालेराव यांची रू २. ४ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे.
संजीवनीच्या नवोदित अभियंत्यांना नामाकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन संजीवनीवर आपण टाकलेला विश्वास सार्थ ठरला आहे, अशी प्रतिक्रीया देत आहे. सध्या १२ वीचे निकाल अगोदरच जाहिर झाले आहे. काल (सोमवार) एमएचटी-सीईटीचा निकाल लागला असुन विध्यार्थी व पालकांची संजीवनीच्या प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्रत लगबग सुरू झाली आहे. अनेक पालक व विध्यार्थी मागिल शाखा व जाती संवर्ग निहाय कट ऑफ जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी एखाद्या विशिष्ट शाखेचा आग्रह न धरता संजीवनी मध्येच प्रवेश मिळण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन श्री कोल्हे यांनी शेवटी केले आहे. कारण संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज हे ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे इंडस्ट्रीच्या गरजांनुसार अभ्यासक्रमाची रचला केलेली आसल्यामुळे नोकरी मिळणारच असा विश्वास पालक व विध्यार्थ्यांनी बाळगावा.
संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे भाग्यवान पालक, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, टी अण्ड पी विभागाची टीम व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.

फोटोः-निवड झालेले नवोदित अभियंते
