वारीतील गोदावरीकाठी महिलांसाठी वस्त्र बदलण्यासाठी व्यवस्थासामाजिक बांधिलकी : टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी येणाऱ्या महिलांना आंघोळीनंतर वस्त्र बदलण्यासाठी गावातील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने बुधवारी (दि.२) तात्पुरत्या स्वरूपात महिलांना वस्त्र बदलण्यासाठी गोदावरी नदीकाठी असलेल्या “ब्रह्मलीन परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज घाट” येथे ग्रीन नेटचा वापर करून व्यवस्था केली, त्याचबरोबर घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सध्या गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. अशातच अधिक मासही सुरू आहे. यानिमित्ताने वारीसह पंचक्रोशीतील असंख्य महिला दररोज नदीकाठी आंघोळीसाठी येत आहेत. आंघोळीनंतर ओले वस्त्र बदलण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या भावनेतून टेके पाटील ट्रस्ट व स्वयंसेवक, स्वच्छता दूत यांच्या अथक परिश्रमातून व सहकार्यातून करण्यात आली.
या उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, सरपंच सतीशराव कानडे, सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छतादूत मधुकरराव टेके, सेवानिवृत्त बँक अधिकारी रावसाहेब जगताप, पोस्ट मास्तर संजय कवाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कवडे, ज्ञानेश्वर जाधव, गोरख जठार, विलास गाडेकर, मनोज जगधने, अशोक नन्नवरे, इंजिनीयर नवनाथ कवडे, पोस्टमन अशोक निळे, सेतू सेवा केंद्राचे संचालक रवींद्र टेके, इकबाल शेख, कदीर शेख यांनी परिश्रम घेतले.

फोटोओळी:-
वारीतील गोदावरीकाठी महिलांसाठी वस्त्र बदलण्याकरीता व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *