

कोपरगाव प्रतिनिधी:-
उभ्या महाराष्ट्रात नावाजलेल्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेतली विद्यार्थिनी कु.साची वीरेश अग्रवाल हिला दहावी सी.बी.एस.सी मध्ये 96% मार्क मिळाले या अभूतपूर्व यशामुळे तिचे सर्वत्र स्वागत होत आहे.
इंग्लिश व आयटी या विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवून ती कौतुकास पात्र ठरली आहे. या यशाबद्दल बोलताना कु.साची म्हणाली डॉ.मनालीताई अमित दादा कोल्हे यांचे सक्रिय मार्गदर्शन मुख्याध्यापक, सर्वच शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद यामुळे तिला हे यश मिळाले.
पुढे ती म्हणाली नो ट्युशन ओन्ली सेल्फ स्टडी आणि 65 सराव पत्रिकेचा अभ्यास त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला अभ्यासाची एकाग्रता व मोबाईल व टीव्ही पासून दूर राहून तिने हे यश संपादन केले आहे.
शालेय शिक्षणा व्यतिरिक्त आय.आय.टी बॉम्बे टेकफेस्ट मध्ये दोनदा पारितोषिक, हिंदुस्तान टाइम कोडेथॉन मध्ये तीनदा सुवर्णपदक, कराटे नॅशनल ब्लॅक बेल्ट प्राप्त साची ही संजीवनी युनिव्हर्सिटीचे श्री.वीरेश अग्रवाल यांची कन्या व सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध व्यापारी श्री.नारायण शेठ अग्रवाल यांची नात आहे. सर्वच व्यापारी वर्गातून व माहेश्वरी समाजातून कु.साची हिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
