डॉ.वैशाली बडदे – आव्हाड यांच्या कामाची लोकराज्यने घेतली दखल…!

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैध्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे- आव्हाड यांनी कोरून काळातील केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल महाराष्ट्र शासनाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या लोकराज्य मासिकाने महिलादिनाच्या अंकात घेतली आहे.
संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या कोरोना साथीमध्ये अनेक वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत भीतीपोटी बाहेर पडण्यास घाबरत असताना शासकीय सेवेतील डॉक्टर , परिचारिका , परिचारक , आशासेवीका , आणि इतरही सेवक आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवेत अहोरात्र राबत राहिले. यापैकीच एक म्हणजे कोपरगाव येथील डॉ. वैशाली बडदे – आव्हाड याही रुग्ण सेवेत आघाडीवर राहिल्या . कोरोना काळात न डगमगता डॉक्टर वैशाली बडदे आपण घेतलेला वसा पूर्ण कारणासाठी सतत पुढे राहिल्या आहेत . त्यानी टेस्टिंग , ट्रेनिंगआणि ट्रीटमेंट या तिन्ही आघाड्यांवर प्रत्यक्ष काम केले .कॉन्टॅक्ट झोन स्थापन करून पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णांची वेळेची चिंता न करता कोविड सेंटरमध्ये अविरत सेवा केली डॉ. बडदे – आव्हाड ज्या कोविड सेंटरमध्ये काम करीत आहे तेथे आतापर्यँत २ हजार ८५६ रुग्णांना दखल करण्यात आले असून त्यापैकी तब्बल २ हजार ८११ रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना वैधकीय उपचार बरोबरच मानसिक आधार देण्याचे कामही डॉ. बडदे – आव्हाड यांनी केले.

जुलै २०२० च्या शेवटच्या आठवड्या पासून कोपरगावातील कोरोना रुग्ण वाढण्यास सुरवात झाली . त्यावेळी डॉ. बडदे यांच्या संकल्पनेतून शहरातील अतिजोखमीच्या भागांची विभागणी करून तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. आजाराची लक्षणे असणाऱ्यांची रॅपिड टेस्ट जाग्यावरच करण्यात आल्या. यादरम्यान तब्बल २५ हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यांच्या या कल्पकतेमुळेच शहरातील रुग्ण वाढीवर आळा बसण्यास मदत झाली . यादरम्यान साधारण १० महिने डॉ. बडदे यांनी आपल्या कुटुंबापेक्षा रुग्णसेवेला अधिक महत्व दिले . या महिला दिनानिमित्त डॉ. वैशाली बडदे- आव्हाड यांच्या कार्यास सलाम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *