“विमा प्रतिनिधी किरण जनार्धन काळे यांचा वारीत नागरी सत्कार सोहळा संपन्न…”

अहमदनगर

‘कोपरगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील वारी येथील भूमिपुत्र एल आय सी विमा प्रतिनिधी किरण काळे यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा एम डी आर टी (अमेरिका)हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत वारी सह, विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून जाहीर नागरी सत्कार करुन किरण काळे यांच्या 21 वर्षे अविरतपणे केलेल्या सेवे बद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली श्री रामेश्वर विद्यालय ,वारी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात आला वारी ग्रामपंचायत , श्री साई सेवा पदयात्री मंडळ वारी ,श्री रामेश्वरविद्यालय वारी स्कुल कमिटी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,वारी ,दि गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड साकरवाडी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गावातील सर्व तरुण मंडळे आणि ग्रामस्थ यांनी भव्य स्वागत व सत्कार केला
‘साई श्रद्धा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारीचे जेष्ठ नेते माजी पंचायत समिती सभापती श्री मच्छिंद्र टेके पाटील होते
प्रतिकुल वेळ असुनही किरण काळे यांनी अहोरात्र काम करून मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करुन त्यांचा सह कुटूंब भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी एल आय सी चे विभागीय अधिकारी वसंतराव कदम साहेब यांनी जिद्दीने काम करणारा योद्धा असे वर्णन करत आजारी असो की कोणत्याही परिस्थितीत काळे कधीही स्वस्थ बसले नाहीत ते नेहेमीच कर्माला प्राधान्य देतात त्यामुळे यश मिळाले असे सांगुन या पुरस्काराची सविस्तरपणे माहिती उपस्थिताना करून दिली गोदावरी बायो रिफायनरी चे बी एम पालवे ,ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके ,यांनी मनोगत व्यक्त करतांना काळे यांच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या
अध्यक्षीय भाषणात मच्छिंद्र पाटील टेके यांनी किरण काळेयांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती इतिहास घडवू शकतो जिद्दीने कष्टाने धाडसाने काम करून आदर्श निर्माण करून साता समुद्रापालिकडे जाऊन वारीचे भूमिपुत्र सत्कार स्वीकारणार ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत हा आदर्श पुढच्या पिढीला कळावा म्हणूनच हा कार्यक्रम विध्यार्थ्यांसमवेत रामेश्वर विद्यालय प्रांगणात आयोजित केल्याचे त्यांनी सांगुन आई वडिलांची सेवा करणाऱ्या ला परमेश्वर निश्चितच सहाय्य करतो याचे हे उदाहरण असल्याचे सांगत काळे यांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक कैलास शेळके सर यांनी केले यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री किरण काळे यांनी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत होत असलेल्या जन्मभुमीच्या या आगळ्या वेगळ्या सत्काराने मी भारावुन गेलो आहे आता यापुढेही अधिक प्रमाणात कार्य करीत राहण्याची ऊर्जा आज मला मिळाली असुन आता पुढचे ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांगुन विमा प्रतिनिधी म्हणुन सतत गावाची सेवा करीत राहील असे सांगुन विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आठवनी त्यांनी सांगितल्या व सर्वांचे आभार मानले
शासनामार्फत झालेल्या इंस्पायर अवॉर्ड प्रकल्पात रामेश्वरचे विद्यार्थी प्रफुल्ल गायकवाड, समीर खवले यांच्या प्रकल्पाची निवड झाल्या बद्दल त्यांचा व मार्गदर्शन करणारे शिक्षक कैलास शेळके, जोर्वेकरसर यांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश भाउ कानडे ,उपसरपंच मनीषाताई गोर्डे ,विशाल गोर्डे ,माजी सरपंच बद्रीनाथ जाधव , माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे,कराळे साहेब, पत्रकार फकीर टेके,मनोज वाघमारे, कृष्णराव पा. जाधव, अजय मेहेरे, जनार्धन काळे,सुभाष जाधव ,सुभाष कर्पे, अशोक गायकवाड,वसंत टेके,संतोषभाऊ गायकवाड,सचिन टेके, वसंतराव वारकर,बाबुशेठकलंत्री ,नानासाहेब नेवगे,शरदकाका संत ,प्रशांत संत , हरी टेके , सौ अनिताताई वारकर ,उज्वलाताई कानडे ,सौ मिराताई काळे, सौ दिपाली काळे ,सौ अनिता टेके आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी साइसेवा पद यात्री मंडळा तर्फे सर्वाना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीते साठी अशोकराव कानडे, अजय मेहेरे , प्रभारी मुख्याध्यापक निकाळजे सर ,तुपे सर, जोर्वेकर सर,गावित सर ,जाधवसर, रासकर सर,शेळके सर,साळुंकेसर ,सुकटे सर सोनवणे मामा आदींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *