
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार वाटचाल...
कोपरगांव प्रतिनिधी- कोणत्याही पालकाची आपला पाल्य त्याच्या पायावर खंबिरपणे उभा रहावा अशी माफक इच्छा असते. पालकांच्या या इच्छा पुर्ण करण्यासाठी व आपल्या संस्थेतुन अभियंता म्हणुन बाहेर पडत असलेल्या विध्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंट अव्याहतपणे काम करीत आहे. या विभागाच्या प्रयत्नांना अनेक नामांकित कंपन्या प्रतिसाद देत आहे. अलिकडेच नामांकित अशा पाच कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेवुन सर्वच विद्या शाखांमधिल ११ नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ४ ते ६ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार वाटचाल सुरू आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विध्यार्थ्यांना प्रथम पसंती देत असल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन निवड झालेल्या गुणवंत अभियंत्यांचे व त्यांच्या भाग्यवान पालकांचे तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ.व्ही. एम. तिडके व त्यांची टीम आणि संबंधित सर्व विभाग प्रमुख यांचे अभिनंदन केले आहे.
कॉनकास्ट इंडिया या कंपनीने हितेश दिपक जाधव, पवार दिव्यारानी अरूण व ऋषिकेश विजय परजणे यांची वार्षिक पॅकेज रू ६ लाखांवर निवड केली आहे. नेटविन कंपनीने प्रतिक संभाजी वाघसकर व सिध्दार्थ भाऊसाहेब आहेर यांची वार्षिक पॅकेज रू ४. ६ लाख देवु केले आहे. विंजित टेक्नॉलॉजिज या कंपनीने आशिष संजय जेजुरकर व ओमकार आण्णासाहेब शिरसाठ यांना वार्षिक पॅकेज रू ४. ५ लाख देण्याचे नेमणुक पत्र दिले आहे. टोयो इंजिनिअरींग कंपनीने चैतन्य शैलेंद्र देशमुख, ओम संदिप शिंदे व शुभम शिवकुमार पेंटेवार यांची वार्षिक पॅकेज रू ४. १४ लाखांवर निवड केली आहे तर मेर्स टेक्नॉलॉजीज कंपनीने पुरब रंजन जाधव याची वर्षक पॅकेज रू ४ लाखांवर निवड केली आहे.
विध्यार्थ्याची प्रतिक्रिया
‘मी सटाना तालुक्यातील एका खेडेगावातील जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. आई वडीलांनी त्यांची आर्थिक क्षमता नसताना देखिल मला जिध्दिने शिकविले. शिकत असताना मला मेकॅनिकल इंजिनिअरींगचे सखोल ज्ञान मिळाले. विशेष म्हणजे सॉलिडवर्क्स या सॉफ्टवेअरचे चांगले ज्ञान मिळाले. पुणे विद्यापीठ अखत्यारीत कॉलेजच्या विध्यार्थ्यांना फक्त तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेनंतर इंटर्नशिप करावी लागते. परंतु संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज ऑटोनॉमस असल्यामुळे अंतिम वर्षाला जाण्याच्या अगोदर पहिल्या तीन वर्षांच्या परीक्षेनंतर सक्तीचे एक-एक महिना इंटर्नशिप करावी लागते. त्याचा मला मुलाखतीच्या वेळी खुप फायदा झाला आणि माझी कॉनकास्ट या स्टील इंडस्ट्रीला मशिनरी पुरविणाऱ्या कंपनीत डीझाईन इंजिनिअर म्हणुन वार्षिक पॅकेज रू ६ लाखांवर निवड झाली. माझे व माझ्या शेतकरी आई वडीलांचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण झाले, ही बाब शब्दात अवर्णनिय आहे’-हितेश जाधव
