”अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कर्ज वितरणात पारदर्शकता आणावी”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला निधी जाहीर झाला मात्र यापुढे कर्ज वितरणात पारदर्शकता असावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की दहा वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार असताना लोक शाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केला अनेक गोरगरीब जनतेच्या नावावर असलेला कोट्यवधी रुपये हडप केले रमेश कदम यांना जेल मध्ये बसावे लागले ते अद्याप जेल मध्ये आहेत तेंव्हापासून निधी अभावी महामंडळ बंद होते मागील भाजप सेनेच्या काळात शेवटचे सहा महिने या महा मंडळाला अध्यक्ष मिळाले मात्र पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही विद्यमान शिव सेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटून गेले अद्याप महामंडळला अध्यक्ष नाही
नुकतीच समाज कल्याण मंत्री ना धनंजय मुंढे यांनी या महामंडळाला एक हजार कोटींचा निधी जाहीर केला
मातंग समाज व इतर पोट जाती यांच्या साठी हे महामंडळ असले तरी या महामंडळाचे कर्ज घेणे हे सर्वसामान्य नागरिकांना जिकिरीचे झाले होते कारण मागील कालावधीत महामंडळ कर्ज वितरण हे अधिकारी ते पदाधिकारी असे दलालांच्या तावडीत सापडले होते त्यामुळे समाजातील बेरोजगार युवक व नागरिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने महामंडळ सुरू केले असले तरी तसे न होता आर्थिक गैर व्यवहारातून कर्ज दिले जात होते त्याची व्याप्ती कोट्यवधी च्या घरात गेली होती मात्र आता नव्याने एक हजार कोटी भागभांडवल जाहीर झाले असून कर्ज घेणारा लाभार्थी, त्याला सुरू करावयाचा व्यवसाय त्याचे ज्ञान तपासून पहाणे आवश्यक आहे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या धर्तीवर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभे करण्यासाठी कर्ज दिल्यास त्यातून खऱ्या अर्थाने समाजातील गोर गरीब तरुण व्यावसायिक होतील अन्यथा आगामी निवडणुकी पूर्वी सर्व निधी वाटप होऊन आहे ती परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे आगामी काळात व्यावसायिक निकष तपासूनच कर्ज वितरित करावे व यात पारदर्शकता यावी अशी मागणी या पत्रकात केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *