Uncategorized

कोपरगाव नगरपरिषदेचा अजब कारभार ‘सेमी-इंग्लिश’ आणि ‘प्रशासन अधिकारी’ पदासाठी ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेचा थेट इशारा; अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेचा अजब कारभार! ‘सेमी-इंग्लिश’ आणि ‘प्रशासन अधिकारी’ पदासाठी ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेचा थेट इशारा; अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन!
“कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभारामुळे आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे शहरातील गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. शिक्षण विभागातील ‘प्रशासन अधिकारी’ आणि शाळांमधील ‘मुख्याध्यापकांची’ पदे रिक्त ठेवून प्रशासन विद्यार्थ्यांच्या हक्काशी खेळत आहे,” असा संतप्त सवाल ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
याबाबत संघटनेने नगरपरिषद प्रशासनाला खालील मागण्यांचे कडक शब्दांतील तीव्र निवेदन सादर केले आहे:

  • कोपरगाव शहराच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेले ‘प्रशासन अधिकारी’ हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. हे पद तत्काळ प्रभावाने भरून येथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक झालीच पाहिजे.
  • खाजगी शाळांच्या अवाढव्य फीच्या स्पर्धेत नगरपरिषद शाळा टिकवण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली पासूनच ‘सेमी-इंग्लिश’ माध्यम सक्तीने सुरू करण्यात यावे.
  • शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांची सर्व रिक्त पदे युद्धपातळीवर भरावीत. तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि मुला-मुलींसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे तातडीने उपलब्ध करून द्यावीत.
    नगरपरिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवून प्रत्येक शाळेची पटसंख्या किमान १०० पार नेण्यात यावी.
    “प्रशासन अधिकारी पदाची नेमणूक आणि सेमी-इंग्लिशची सुरुवात यावर त्वरित पावले न उचलल्यास, संघटनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल,” असा कडक इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षणमंत्री, स्थानिक खासदार, पालकमंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
    विनीत:
    विनय भगत, मयूर आव्हाड, विजय जाधव, अमित आढाव.
  • ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *