प्रहारच्या प्रयत्नातून प्रसादनगर भागातील कामगारांना मध्यान्न भोजन सुरु…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
प्रहार श्रमिक सेवा संघाच्या प्रयत्नांतून देवळाली प्रवरा हद्दीतील असलेल्या प्रसादनगर भागात आज पासून मध्यांन भोजन सुरु करण्यात आले.
प्रहार श्रमिक सेवा संघाच्या प्रयत्नांतून व महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने राज्यातील असंघटीत कामगारांना देण्यात येणारे मध्यान भोजन प्रसादनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तैनुरभाई पठाण यांचे हस्ते गाडीला विधिवत हार घालुन व नारळ फोडून सुरू करण्यात आले.
प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, सचिव बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी फॅक्टरी महीला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष वंदना कांबळे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे आणि लाभधारक असंघटित कामगार उपस्थीत होते.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरामध्ये प्रहाचे माध्यमातून पाच ठिकाणीं कामगार मंडलाचे वतीने देण्यात येणारे मध्याणं भोजन व्यवस्था केली असून प्रसादनगर भागातील जवळपास पस्तीस कामगारांना या मध्याण भोजनाचा लाभ मिळणार आहे. येथील जास्तीत जास्त कामगारांनी प्रहार श्रमिक सेवा संघाकडे आपली नोंद करुण मध्यानं भोजनासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करुण देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रहार कटिबध्द असुन कामगार मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कडून नागरिकांना तात्काळ सेवा मिळत असल्याबद्दल ढूस यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तैनुर भाई पठाण यांनी प्रसादनगर भागात प्रहार तर्फे विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रसंगी प्रहार च्या महीला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व ही योजना सुरु करण्यात आल्या बद्दल लाभधारकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *