कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातक्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले युवा मंच व महात्मा फुले मंडळ तसेच माळी बोर्डिंग कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता कोपरगाव शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ही मिरवणूक माळी बोर्डिंग इथून सायंकाळी पाच वाजता वाजतगाजत शहरातून भव्य मिरवणूक निघून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी प्रतिमेचे पूजन व जयंती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या भव्य मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले युवा मंच, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष विशाल राऊत, प्रदीप नवले, वीरेन बोरावके, बापू वढणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *