माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जंतयी निमित्त भुजबळ फार्म येथील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. शेफाली भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी नगरसेविका कविता कर्डक, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, संजय खैरनार, नाना सोमवंशी, शंकर मोकळ, उदय सराफ,भालचंद्र भुजबळ, अमर वझरे, मोतीराम पिंगळे, ज्ञानेश्वर महाजन, योगेश निसाळ, राहुल तुपे, सागर मोटकरी, सुनील त्रिभुवन, पप्पू शिंदे, आकाश म्हस्के, सुरेश अहिरराव, युवराज मोहन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *