आर जे एस नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा,वृक्षरोपण करून जागवल्या आठवणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ साली जिनिव्हा येथे प्रथमच जागतिक आरोग्य सभा भरवली आणि १९५० साली जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला. WHO ने आपल्या स्थापना दिवसापासून म्हणजेच ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
याचेच औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील नामवंत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज मध्ये ८ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून झाली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली हे होते.त्यांनी आपल्या भाषणात जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणशैलीत समजावून सांगितले.
जागतिक आरोग्य दिनाविषयी वेगवेगळ्या संकल्पनेतून आरोग्य विषयक जन जागृती करण्यात आली.त्याच प्रमाणे व्हिडिओ क्लिपद्वारे WHO जगतिक आरोग्य दिनाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य दिनाविषयी आपले मनोगत मांडले नर्सिंग कॉलेजच्या प्रथम व द्वितीय, इंटरशिप वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजुषा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.प्रश्न मंजुषा स्पर्धेत आलोक समदुर,राजरत्न पवार,वैष्णवी पवार,प्रगती पवार तर चित्रकला स्पर्धेत काद्री तस्किया जमील हे विजयी झाले.या सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या जागतिक आरोग्य दिनाची आठवण रहावी म्हणून नर्सिंग कॉलेज च्या आवारात झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशद आली,उपप्राचार्य जिल्स सुरेश व इतर सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी:-
कोपरगाव/कोकमठाण येथे नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त वृक्ष रोपण करतांना प्राचार्य इरशाद अली उपप्राचार्य जील्स सुरेश व सोबत सर्व विद्यार्थी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *