
कोपरगाव प्रतिनिधी;- तालुक्यातील वारी येथे साई चरित्र पारायन व पालखी सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असुन गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ पासुन वारीत साई-मारुती मंदीर येथे शनीमंदिरा जवळ साईचारित्र पारायणाला प्रारंभ झाला आहे ९० च्या वर पारायनार्थी सहभागी आहेत
महिलांनी मोठया संख्येने परायनात सहभाग घेतला असुन पहाटे ६ पासुन मंत्रजप , स्तवन मंजिरी व साईचारित्र पारायण तसेच दोन वेळा सामुदायिक सवाद्य आरती असा कार्यक्रम नित्य नेमाने सुरु असुन वारीत वातावरण साईमय झाले आहे नुकतीच पारायण कार्यक्रमाला प्रसिद्ध भारूड सम्राट ह भ प भानुदास महाराज बैरागी, ह भ प रामेश्वर महाराज बैरागी, साईकथाकार ह भ प बाळकृष्ण महाराज सुरासे , ह भ प शिवाजी महाराज ठाकरे ,मृदुगाचार्य ह भ प कृष्णामहाराज लकारे ,गोदावरी बायोरिफायणारीजचे मेडिकल ऑफिसर डॉ डी एम दरंदले आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत
पारायण सांगता कार्यक्रमा निमित्ताने बुधवार दिनांक १६ मार्च २०२२ रोजी शिवचरित्रकार ह भ प सर्जेराव महाराज टेके यांचे सकाळी १० ते १२ वा या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे तर गुरुवार दिनांक १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता पालखी पुजन होऊन वारी ते शिर्डी पिंपळवाडी मार्गे साई पालखी जाणार असल्याचे साईसेवा पदयात्री मंडळाने जाहीर केले आहे

वारी पंचक्रोशीतील सर्व साई भक्त, तरुण मंडळे, सर्व भजनी मंडळ,जय बाबाजी भक्त परिवार स्वामी समर्थ भक्तपरिवार, जगदंबा आरती मंडळ, ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवान ट्रस्ट व आरती मंडळ , स्वाध्याय परिवार अशा सर्व धार्मिक मंडळाच्या व गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागामुळे आजवर साई पालखी सोहळा यशस्वीपणे पार पडत आला आहे
याही वर्षी वारी
पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याला कृपया उपस्थित राहुन साई सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा पदयात्री मंडळाच्या वतीने आयोजकांनी केले आहे
