शिक्षक, पालकांमध्ये सुसंवाद असणे महत्वाचे:- शबाना शेख ; वारी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद गरजेचा असुन तसेच मातानी आपल्या पाल्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी म्हंटले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि.१४) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्वच चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या १७ गाण्यावर वेशभूषा परिधान करून आपल्या कला गुणांचा आविष्कार सादर केला. तसेच तिसरीतील सिद्धांत मोहरे याने सादर केलेले जादूचे विविध प्रयोगांनी तर उपस्थितांना अचंबित केले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून मिळालेल्या अडीच लाख किमतीच्या इंटरअँक्टीव्ह बोर्डचे गटशिक्षणाधिकारी शेख यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

 शेख म्हणाल्या, मागील काही वर्षात वारी शाळेच्या पट संख्येचा आलेख बघता विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती. परंतु, अलीकडच्या काळात चांगलीच सुधारणा होऊन पट संख्या वाढू लागली आहे. तसेच भव्य स्वरुपात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनातून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळते. त्यामुळे  शाळेबरोबरच गावाच्या नावलौकिकात भर पडते. वारी शाळेतील कामकाजासह विध्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहून निश्चितच समाधान वाटले.  
या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, सरपंच सतीश कानडे, केंद्रप्रमुख विलास भांड,भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, प्रकाश गोर्डे, विशाल गोर्डे, सतीश मैराळ, मच्छिंद्र गांगड, डॉ. सर्जेराव टेके, मुकुंद जोशी, जयसिंग बनगैय्या यांच्यासह महिला पालकांची उपस्थितीत लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे, शर्मिला विधाते या शिक्षकासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविकिरण भोजने व पांडुरंग खाडे यांनी केले तर दत्तात्रय चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

फोटोओळी:-
वारी येथील जिल्हा परिषद शाळेत कलाविष्कार सादर करताना चिमुकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *