


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सुनील नारायण कुसुंदर यांनी आगळी वेगळी धार्मिक यात्रा केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील सुनील नारायण कुसुंदर यांनी कोपरगाव ते शिर्डी ,शिर्डी ते वैष्णवीदेवी सायकलवर प्रवास नुकताच केला आहे. अंदाजे ३२०० किलोमीटर हा प्रवास आहे.शहरातील बाबाराजे देशमुख विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक अर्जुन मोरे,समता बँकेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मनसे अध्यक्ष अनिल गाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सत्कार केला आहे


