मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी 10,000 पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प:- एस.एम.देशमुख…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आपली मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषद येत्या ३ डिसेंबर रोजी स्थापनेची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात प्रवेश करीत आहे..मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुनी पत्रकार संस्था आहे आणि आपण या संस्थेबरोबर जोडलेलो आहोत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची बाब आहे.. एखादी संस्था सलग ८३ वर्षे चालते, एक मिशन म्हणून काम करते आणि पत्रकारांचे प्रश्न सोडविते हे चित्र दुर्मिळ आहे.. आणखी १७ वर्षांनी आपली संस्था १०० वर्षांची होणार आहे.. म्हणूनच परिषदेला आपण जपले पाहिजे..
मराठी पत्रकार परिषदेचं वलय आणि परिषदेचं काम पाहून पोटदुखी होणारे अनेकजण आहेत.. ते सातत्यानं वेगवेगळ्या वावड्या उठवत असतात.. अशा पोस्टवर मी कधीच खुलासे करीत नाही.. त्याची गरजही नसते..आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देत आलेलो आहोत.. यापुढं देखील अशा नतदृष्टांना आपण आपल्या कामातूनच उत्तरं देऊ…
परिषदेचा वर्धापन दिन म्हणजे ३ डिसेंबर हा दिवस आपण पत्रकार आरोग्य तपासणी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो.. माझी आपणासर्वांना विनंती आहे की ८४ वा हा वर्धापन दिन देखील आपण साजरा करू.. त्यानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जावी.. स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब, डॉक्टर मित्रांचे सहकार्य घ्यावे.. यावर्षी ३ डिसेंबर रोजी १०,००० पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेनं सोडला आहे.. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आपणासर्वांची जबाबदारी आहे आणि ते आपले कर्तव्य देखील आहे..
सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *