शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले अशी दुःखद बातमी अचानक आमच्या कानी आली आम्ही सर्व गर्भगळीत झालो:- राजवीर पाटील राजोळे…

Uncategorized
        २४ मार्च २०२२ शंकरराव गेनूजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस त्यानिमीत्त आम्हां सर्व सहका-यांना त्यांचे जुने फोटो संगणकात जपून ठेवण्याची कामगिरी दिली. आमचे बरोबर वीरेंद्र जोशी, प्रतिक उगले, मधुकर डुबे, प्रसाद गवारे, निलेश देविदास जगताप, अक्षय परमेश्वर खरात, आदिसह संजीवनी अभियांत्रिकी व तांत्रीक शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थीनीही होत्या. प्रा. कापगते सर व त्यांचे सर्व सहकारी सुपरव्हिजन करण्यासाठी होते. १ मार्च २०२२ पासुन आम्ही काम सुरू केले. जुन्या कार्यक्रमातील ६२ वर्षातील फोटोंची संख्या ३० ते ४५ हजाराच्या घरात होती. ते सर्व संगणकात जपून ठेवण्याच्या कामाने वेग घेतला होता कामही अंतिम टप्प्यात आले होते. १९६० पासून सन २०२२ पर्यंत आम्ही छायाचित्रे संगणकावर घेत होतो. शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले अशी दुःखद बातमी १६ मार्च २०२२ रोजी अचानक आमच्या कानी आली. आम्ही सर्व गर्भगळीत झालो. पुढे आम्ही संगणकात जपून ठेवलेल्या सर्व छायाचित्रांचे एक कोलाज तात्काळ तयार करण्यात आले आणि शंकरराव कोल्हे साहेबांचा फोटो येणा-या प्रत्येक कार्यकर्त्याला श्रध्दांजली वाहतांना दिसत होता, मनांत प्रचंड दुःख होते. संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर शंकरराव कोल्हेंचे हे कोलाज रस्त्यावरून येणा-या जाणा-यांना दिसायचे मनांत त्यांच्या भावनांचा प्रवास सुरू व्हायचा, केव्हढं मोठं आमचं भाग्य, चला शेवटच्या क्षणी का होईना ६२ वर्षात कोल्हे साहेबांबरोबर साथ संगत केलेल्या कार्यकर्त्याची छबी त्यांच्या चेह-याच्या फोटो रूपाने दिसली.

राजवीर पाटील राजोळे, काले मळा,
कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *