अभिमान नारी शक्तीचा, सन्मान आमच्या ताईचा:- पत्रकार संजय पंडित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कौतुकाच्या हार्दिक शुभेच्छा रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने नाभिक कन्या प्रगती साहेबराव वाघमारे या रणरागिणीचे तिच्या घरी जाऊन कौतुकाचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
आपली नाभिक कन्या,आपले समाज रत्न कु.प्रगती साहेबराव वाघमारे(मु.पो.कळस, ता.पारनेर, जि.अहमदनगर) जपानला प्रयाण करीत आहे,तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या तर्फे सकल नाभिक समाजाच्या वतीने शुभेछा देण्यात आल्या.
यावेळी पक्षाचे मान्यवर पदाधिकारी श्रीयुत गोपीनाथराव बिडवे,नामदेवराव नायकोडी, ओंकार भालेकर, भरत भालेकर,दीपक बोऱ्हाडे,साहेबराव वाघमारे,गजानन वाघमारे,
सौ.सुरेखा वाघमारे,सुनंदा भालेराव, आनंदाबाई वाघमारे,प्रमिला वाघमारे आणि कळस गावातील नाभिक बांधव तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्दारे, राष्ट्रीय जनसेवा पक्ष
आमची अस्मिता,आमचा स्वाभिमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *