संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धी
कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची संशोधनात्मक इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) कॅनडाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की मिटॅक्स ही कॅनडा मधिल संस्था असुन मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप हा ऑस्ट्रेलिया, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, हाॅंन्गकाॅन्ग, भारत, मेक्सिको, पाकिस्तान, तैवान, ट्युनिसिया, युक्रेन, आणि युनायटेड स्टेटस् या देशांमधील पदवीधरांसाठी स्पर्धात्मक उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत उच्च श्रेणीच्या कॅनेडियन विद्यापीठातील प्राध्यापकांच्या देखरेखीखाली विज्ञान, अभियांत्रिकी, गणित अशा विविध विषयांमध्ये १२ आठवड्यांच्या संशोधन इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक असतो. मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप सध्या कॅनडातील ७० हुन अधिक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.
मिटॅक्स आणि आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्यामधिल सामंजस्य करारामुळे भारतातील एआयसीटीईच्या अखत्यारीतील संस्थांमधिल ३०० विध्यार्थ्यांना या इंटर्नशिपचा फायदा होतो. भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा संस्थांमधिल विध्यार्थ्यांची निवड मोठ्या संख्येने होते. मात्र संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी संजीवनी मधुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर मिटॅक्सच्या सर्व कसोट्या पुर्ण करून बाजी मारली. मागील वर्षी फक्त तीनच विद्यार्थ्यांची निवड झाली होती. मात्र या वर्षी ४ विध्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विध्यार्थ्यांचा विमान प्रवास खर्च, राहणे व जेवणाची व्यवस्था कॅनडा सरकार तर्फे करण्यात येणार आहे. तृतिय वर्षाच्या नकुल विजय निबे याची मेमोरियल युनिव्हर्सिटी ऑफ न्युफाऊंडलॅन्ड, निकिता नवनाथ पवार हिची युनिव्हर्सिटी दि क्युएबेक चिकौटिमी, पार्थ भरत पानगव्हाणे याची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी व श्रेयश गणपत भोर याची युनिव्र्हसिटी ऑफ मनिटोबा मध्ये तीन महिन्याच्या इंटर्नशिपससाठी निवड झाली आहे.
या विध्यार्थ्यांना संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डाॅ. महेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी विध्यार्थ्यांच्या यशाबध्दल अभिनंदन केले.

फोटोः सोबत इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या चार विध्यार्थ्यांचे फोटो
