

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिषभाऊ कानडे यांना वारी गावाकरिता दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल अजिंक्य भारत दैनिक वृत्तपत्र यांचे वतीने देण्यात येणारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान सरपंच/उपसरपंच यांच्या पाठीवर शाबासकी देणारा मानाचा “गाव कारभारी पुरस्कार २०२३” नुकताच अहमदनगर येथे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे हस्ते व शिवसेना अहमदनगर जिल्हा प्रमुख प्रा शशिकांतजी गाडे यांचे उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हाभरातील अनेक सरपंच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते
अजिंक्य भारत दैनिक आयोजित गाव कारभारी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम अहमदनगर येथे मोठ्या दिमाखात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील होते यावेळी मुख्य संपादक संदीप थोरात, संपादक रामदास ढमाले,अजिंक्य भारत चे सरव्यवस्थापक अविनाश कराळे यांनी परिश्रम घेत माऊली सभागृहात उत्तम नियोजन केले होते
सदरचा पुरस्कार मिळाल्याने वारी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत सतिशभाऊ कानडे यांचे अभिनंदन केले आहे वारी पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असुन कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस त्यांनी सेवा दिली होती तसेच गेल्या ५५ आठवड्यापासुन ग्रामपंचायत वारी,कै राहुल टेकेपाटील ट्रस्ट,जय बाबाजी भक्त परीवार यांच्या संयुक्त सहभागातून अविरतपणे सुरु असणाऱ्या ग्राम स्वच्छता अभियानात सरपंच सतिषभाऊ कानडे स्वतःसहभागी होऊन सेवा देतात तसेच गावाला जोडणारे तसेच गावातील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारी, पाणीपुरवठा योजना,दलीतवस्ती सुधार योजना,सांडपाणी व्यवस्थापन, कचरा नियोजन, अनेक भागात पेव्हर ब्लॉक, हायमॅक्स बसविणे,घंटागाडी,ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे या सारखे सर्व समाज घटक शेतकरी कामगार यांचे असंख्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत वारी गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी उपसरपंच व सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच अनेक कामे पूर्ण करू शकल्यानेच पुरस्कारास आपले गाव व मी पात्र ठरल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली
या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नुकताच वारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
पुरस्कार मिळाल्या बद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,गोदावरी बायोरिफायणारी जचे डायरेक्टर सुहासजी गोडगे,जेष्ठ नेते नामदेवराव जाधव,प स सदस्य मधुकरराव टेके,माजी सभापती मच्छिंद्र टेके ,माजी सरपंच रावसाहेब टेके,बद्रीनाथ जाधव,दैनिक लोकमतचे उपसंपादक रोहीत टेके ,माजी प स सदस्य अशोकराव कानडे राजेंद्र वाळुंज, सतिश मेराळ,गोरख टेके,विशाल गोर्डे,महेश टेके,बाबासाहेब शिंदे,सचिन टेके ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर यांचेसह व्यापारी व ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे
