मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात वृक्षारोपण…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरला गेला नाही तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्याची प्रचीती यावर्षीच्या उन्हाळ्यात आली असून १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना म्हणून २०२२ मधील मार्च महिन्याची नोंद करण्यात आली आहे.पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यामुळे वृक्षारोपण व त्याचे संगोपन हा निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी योग्य पर्याय आहे. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान व कारखाना परिसरात जवळपास २५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी केली होती.
या प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, फॅक्टरी मॅनेजर दौलतराव चव्हाण,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनजर सोमनाथ बोरनारे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – मा.आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित त्यांच्या हस्ते कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *