


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौक खैरे कॉम्प्लेक्स, येथे १९ फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व त्यांचे बंधु समिर वर्पे यांच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रसंत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रसंत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे संत पुजन करण्यात आले आहे. संदीप वर्पे , समीर वर्पे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र वाकचौरे, तुषार पोटे, राहुल देवळाळिकर, सागर लकारे, अशोक लांडगे, बापू वढणे, लक्ष्मण सताळे आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


