शिर्डी येथे नाभिक राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी येथील साईबाबांची कृपेने पावन झालेल्या शिर्डी ता.राहाता परिसरात सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाभिक समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नाभिक समाजातील उपवर विवाहेच्छुकांना विवाह योग्य अनुरूप स्थळे सहज सुलभ आणि योग्य माहितीसह उपलब्ध व्हावीत या दृष्टीने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ अहमदनगर यांच्या वतीने या भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तमाम नाभिक बांधवांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक राष्ट्रीय एकता महासंघ अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विवाहइच्छुकांनी आपल्या जवळील आयोजकांकडे संपर्क साधून वधू-वर फॉर्म भरून आपली नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे असे आयोजकांनी आवाहनात म्हटले आहे. तसेच या मेळाव्यासाठी प्रथम वधु-वर, सलून व्यवसायिक, घटस्फोटीत, विधूर, विधवा, दिव्यांग आदींसह आपल्या स्वतःच्या रंगीत फोटोसह माफक फी २००/- सहीत आयोजकांकडे जमा करावीत. विवाहेच्छुक वधू-वरांना यामध्ये मोफत पुस्तिका, मेळावा प्रवेशिका व स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यास विवाहेच्छुकांनी सकाळी लवकरात लवकर उपस्थित राहून आपली पुस्तिका व प्रवेशिका ताब्यात घ्याव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी २६ जानेवारी २०२३ शेवटची तारीख असेल. याव्यतिरिक्त या राज्यव्यापी मेळाव्याच्या पुस्तिकेत शुभेच्छा तथा जाहिराती देण्यासाठी इच्छुकांनी त्वरित मो. क्र. ९२२६३७३९९९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देखील मेळाव्याचे आयोजक आणि नाभिक एकता महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष साईभक्त मनोज वाघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *