कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे श्रीमद् भागवत कथाज्ञान यज्ञाचे आयोजन, १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यक्रम असणार आहे:- कातकडे परिवार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे कातकडे परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धर्मप्रचारक साध्वी स्थितप्रज्ञानंदजी सरस्वती (माताजी) यांच्या अमृतवाणीतून १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या ७ दिवसात दररोज सायंकाळी ३.३० ते ७ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा आपणास ऐकण्यास मिळणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भागवताचार्य ह.भ.प. श्री. माधवदास राठी महाराज, यांच्या अमृत वाणीतून काल्याचे कीर्तन होणार आहे.या कार्यक्रमासाठी प. पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज, प.पु.स्वामी दत्तगिरीजी महाराज, प. पु. स्वामी मधुगिरीजी महाराज, प.पु.स्वामी माधवगिरीजी महाराजशिवभक्त भाऊ पाटील, त्र्यंबकेश्वर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या श्रीमद् भागवतकथेचा लाभ घ्यावा.असे आवाहन कातकडे परिवार कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *