गौतम पब्लिक स्कूलचा याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० टक्के…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर -२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
गौतम पब्लिक स्कूलचे ५८ विदयार्थी शासकिय चित्रकला स्पर्धेस (इंटरमिजिएट) बसले होते. या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेत ‘अ’ श्रेणीत १६ विद्यार्थी, ‘ब’ श्रेणीत ०७ विद्यार्थी तर ‘क’ श्रेणीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत सर्वोच्च निकालाची परंपरा राखलेली आहे.
संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलमध्ये नेहमीच अभिनव उपक्रम राबविले जातात. या उपक्रमात विद्यार्थी सहभागी होवून यश संपादन करून शाळेच्या नावलौकीकात भर टाकत असल्याची माहीती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याना शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्याचे व कला शिक्षकाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो ओळ – चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत समवेत प्राचार्य नूर शेख, कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *