श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत शौर्य दिवस साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत युध्दाचा २६२ वा शौर्य दिवस साजरा करण्यात आला आहे.
पानिपतच्या रणभूमीवरील रणझुंजार वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार, मराठा साम्राज्याची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) बाजीराव पेशवा, कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम यशवंतराव सदाशिवराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन आत्मा मालिक एन.डी.ए.अॅकेडमीचे सैनिक प्रशिक्षण प्रमुख,भारतीय सैन्यदलाच्या गुप्तचर सन्मानित साईनाथ वर्पे यांचे शुभहस्ते करण्यात आले.”हर हर महादेव” जय घोष करीत तीन तोफांची सलामी देण्यात आली.


या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आत्मा मालिक एन.डी.ए.अॅकेडमीचे सैनिक प्रशिक्षण प्रमुख,भारतीय सैन्यदलाच्या गुप्तचर सन्मानित साईनाथ वर्पे,यांनी पानिपतच्या रणभूमीवर थंडीचा गारवा झेलत मराठा सैन्याने दिलेली कडवी झुंज आणि पराक्रम ऐकुन आजही अंगावर शहारे येतात.असे सांगतले.याप्रसंगी श्रीमंत पवार सरकार व श्रीमंत पेशवे यांच्या कोपरगावातील वास्तव्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
प्रारंभी आत्मा मालिक एन.डी.ए.अॅकेडमीचे सैनिक प्रशिक्षण प्रमुख,भारतीय सैन्यदलाच्या गुप्तचर सन्मानित साईनाथ वर्पे यांनी सोमेश्वर महादेवास अभिषेक करुन पुजा व आरती केली.यानंतर त्यांच्या मानाची शाल, पुष्पहार,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मराठा पंचचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे,बाळासाहेब नरोडे,प्रगतशील शेतकरी नितीन शिंदे,संत ज्ञानेश्वर स्कूलचे संचालक विशाल झावरे,जय तुळजा भवानी मंडळाचे दत्ता काले, ब्राह्मण सभेचे बाळासाहेब कुलकर्णी, मुंबादेवी तरुण मंडळाचे सुनिल फंड उपस्थित होते.


सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, नारायण अग्रवाल, महावीर शिंगी,जयंत पाटील,मनोज कपोते,जयंत विसपुते,पौरोहित्य प्रदिप पदे गुरुजी,नंदु शेंडे गुरव,शेंदुरणीकर गुरुजी,मुरली निकुंभ,चंद्रकांत कानडे,दिलीप जोशी,मदन गोळेचा,धनंजय कहार, संजय जाधव,प्रदिप मते,नंदु जाधव,आप्पा निकुंभ,विजय उदावंत आदिंसह सोमेश्वर देवस्थान भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *