
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात मागील काही दिवसात झालेल्या चोरीच्या घटना लक्ष्यात घेता पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत अनेक भागात नगर पालिकेच्या कृपेने स्ट्रीट लाईट बंद आहेत त्यामुळे किरकोळ चोरी बरोबरच मोठ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्याच बरोबर मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहे
कोपरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी रस्त्यावरच्या गाड्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट व ट्रिपल सिट गाड्या पकडण्यात व्यस्त आहेत
आता तरी नगर पालिकेने चोरीच्या वाढत्या घटना पहाता स्ट्रीट लाईट सुरू करावेत तसेच पोलीस विभागाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
