श्री सप्तशृंगी माता मंदिरात रमेशगिरी महाराज, गणपतराव लोहाटे महाराज व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते महाआरती, चैत्र महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील बिरोबा चौक भागातील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या चैत्र महोत्सवात रविवारी (९ एप्रिल) रात्री राष्ट्रसंत जनार्दन (मौनगिरी) स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज, ह.भ.प. गणपतराव लोहाटे महाराज आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते श्री सप्तश्रृंगी मातेची महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
चैत्र महोत्सवानिमित्त श्री सप्तश्रृंगी माता मंदिराला ४०० किलो द्राक्षांची सुंदर आरास करण्यात आली होती. रविवारी रात्री श्री सप्तश्रृंगी मातेचे प. पू. रमेशगिरी महाराज, ह.भ.प. गणपतराव लोहाटे महाराज आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी श्री सप्तश्रृंगी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच प. पू. रमेशगिरी महाराज, ह.भ.प. गणपतराव लोहाटे महाराज यांचे आशीर्वाद घेतले. महाआरतीनंतर महाप्रसादाचा (भंडारा) कार्यक्रम झाला. विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित भाविक-भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून त्यांच्यासमवेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजयराव सातभाई, दिलीपशेठ दारूणकर, राजेंद्र सोनवणे, शिवसेना नेते कैलासराव जाधव, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी, अनिलशेठ जाधव, संजय जगदाळे, जनार्दन कदम, वैभव गिरमे, अशोक लकारे, दीपकशेठ काले, आनंदशेठ काले, राजाभाऊ शिंगी, रमेशशेठ शिरोडे, योगेश अमृतकर, विक्रमादित्य सातभाई, कैलास खैरे, श्याम जंगम, ज्ञानेश्वर गोसावी, आशिष निकुंभ, रंजन जाधव, पप्पू पडियार, कुणाल लोणारी, निखील जोशी, आनंदराव घोडेराव, एन. दत्ता, रिपाइं नेते जितेंद्र रणशूर, गोपीनाथ गायकवाड, प्रसाद आढाव, विष्णुपंत गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, परशराम भावसार, गिरीश लोहारीकर, शुभम भावसार, बंटी गोसावी, मयुर लचुरे, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, हेमंत चव्हाण, संतोष चव्हाण, पिंटू नरोडे, संतोष साबळे, अर्जुन मरसाळे, संजय मंडलिक, ओम बागुल, देविदास बागुल, निखील लोढा, रोहन दरपेल, शरद कुलकर्णी, दत्तात्रय उदावंत, पुरुषोत्तम जोशी, राहुल खडांगळे, हेमंत गोसावी, किरण कानडे, निलेश वालझाडे, सतीश खैरे, आशिष गुजराथी आदींसह व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *