

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात वारवार लाईट बंद होत असल्यामुळे नागरिकांना संताप होत असुन महत्वाच्या काम या विजेच्या लंपडावामुळे होत नाही.यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता.दिनांक ५ /११ /२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे,जिल्हाध्यक्ष राजेशजी लुटे, तालुका संघटकवरघुनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विज वितरण कंपनीला इशारा देण्यात आला होता कि, कोपरगाव शहरांमध्ये जो लाईटिचा जो लपंडाव चालु आहे तो त्वरित थांबवावा अन्यथा मनसे स्टाईल ने अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल यांच अनुषंगाने कोपरगाव पोलीस स्टेशन चे दबंग पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले साहेब यांनी विज वितरण कंपनीचे अधिकारी खराटे साहेब, पंडोरे साहेब,गायकवाड साहेब तसेच हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापुभाऊ काकडे मनसे उपशहराध्यक्ष अनिलभाऊ गाडे,विद्यार्थी उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर,मनसे युवा नेते नवनाथ मोहिते यांची बैठक घेऊन होणाऱ्या विज खंडित प्रकारात सुधारणा करणार असल्याचे तसेच त्वरित टेलीफोन दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले होते तसेच लाईट जास्त वेळ जाणार असल्यास व्हाट्सअप मेसज द्वारे कळविण्याचे देखील सांगण्यात आले होते त्याच अनुषंगाने वासुदेवजी देसले साहेब व खराटे साहेब यांनी स्व:ताहा लक्ष देऊन विज वितरण कंपनीचा टेलीफोन दुरुस्त करुन घेतला असुन येवला रोड येथील १:३० ते ४:०० वाजेपर्यंत लाईट जाणार असल्याचे मेसेज द्वारे जनतेस कळविल्या बद्दल सर्व अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेच्या वतिने आभार मानण्यात आले आहे.
