सौ.दिपाली निंबाळकर बंसल यांनी दिला आईच्या शाळेला ५० इंची वन प्लस कंपनी चा अॅन्ड्राॅईड एल ई डी टिव्ही भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
संबधित वृत्त असे की, कोपरगाव येथील रहिवासी माजी सैनिक भाऊसाहेब निंबाळकर व नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 6 च्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना ताई निंबाळकर यांची कन्या सौ.दिपाली निंबाळकर बंसल या सध्या बंगलोर येथे गेल्या दहा वर्षांपासून मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत असून त्या दीपावली निमित्त कोपरगाव येथे माहेरी आल्या होत्या.कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळात शिक्षिका असलेल्या आईकडून लहानपणापासून त्यांच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यां बद्दल ऐकायला मिळत असे आणि त्यांच्यासाठी आईची तळमळ पण दिसायची,याची जाणीव ठेवून त्यांनी आईला विचारून त्यांचे शाळेसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्रमांक सहाच्या मुख्याध्यापिका असलेल्या आईने आमच्या शाळेसाठी एक आधुनिक टीव्ही ची मागणी मुलीकडे केली तेव्हा मुलीने क्षणाचा ही विलंब न करता ऑनलाइन टीव्ही बुकिंग केला आणि ती जोपर्यंत कोपरगावात होती,तोपर्यंत टीव्ही पण घरी पोहोचला आणि कोणताही गाजावाजा न करता घरच्या घरीच वन प्लस कंपनीचा 50 इंची अँड्रॉइड एलईडी टीव्ही टीव्ही आईच्या स्वाधीन केला आणि कंपनीच्या लोकांना पण सांगून शाळेमध्ये पाहिजे त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीने आईने मुलीचे खूप खूप कौतुक केले आणि या टीव्हीचा वापर शाळेतील गरीब मुलांना शिक्षणासाठी कसा जास्तीत जास्त वापर करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी व नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे, यांनी दीपाली चे अभिनंदन केले आहे.समाजातून व सर्व शिक्षकांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.
प्रिय दिपा खूप खूप धन्यवाद!!!
चिमुकली बालके रमली शिक्षणाच्या वारीत!!! घेतील भरारी पाखरे, करतील चमकदार कामगिरी!!
प्रेरणा आणि प्रोत्साहनाची तुझ्या दातृत्वाची गाथाच न्यारी!!
2021 रोजी निंबाळकर ताई नगरपालिका शाळा क्रमांक सहा शाळेच्या मुख्याध्यापक पदी रुजू झाल्या. विविध उपक्रम आम्ही शाळेत घेत होतो. वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजक खेळ,शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांचा अभ्यास असे अनेक उपक्रम आम्ही राबवले परंतु अध्ययन अध्यापन प्रकियेत आधुनिक तंत्रांचा वापर केल्याशिवाय बदलत्या युगात प्रगती होऊ शकत नाही हे आमच्या लक्षात आलं. आम्ही साऊंड सिस्टीम घेतली त्यातून अनेक बदल विद्यार्थ्यांमध्ये जाणवू लागले..अशा परिस्थितीत दिपा,तू आमच्या गरीब,आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांसाठी 50 इंची मोठा एलईडी टीव्ही शाळेसाठी दिला…. प्रथमतः तुझे खूप खूप धन्यवाद……
आता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर करून नवनवीन बदल होतील आनंददायी अध्ययन अध्यापनात विद्यार्थी सहभागी होतील, उपस्थिती वाढेल …..
पाखरं रमतील आता शाळेत गातील नवनवीन गाणी…… शिकतील सर्व विषयाचा सार, संभाषण कौशल्याने सजेल त्यांची वाणी ……
विद्यार्थ्यांना दिलेला हा मायेचा ओलावा
चिरकाल स्मरणात राहील ……..
आमच्या शाळेच्या वतीने तुझे व तुझ्या कुटुंबियांचे खूप खूप धन्यवाद
ये दुवा करते है
हर लम्हा खुशियोंसे
भरदे तेरी झोली…..
आरती कोरडकर
नगरपालिका शाळा नं.6
कोपरगाव विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवीन दिशा मिळेल, ही सौ. सविता साळुंके यांची प्रतिक्रिया आहे.श्री अरुण पगारे यांची प्रतिक्रिया-विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळेल तसेच अध्ययन अध्यापनात रंजकता येईल अँड्रॉइड टीव्ही मुळे शिक्षण पद्धती दर्जेदार होईल.
श्रीमती सुनिता इंगळे यांची प्रतिक्रिया
शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत अचानक वर्गात लावलेला टीव्ही बघून विद्यार्थी खूप खुश होते आपल्या पुस्तकातील कविता आता टीव्हीवर बघावयास मिळणार त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी खुश होता….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *