
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 13/12/2023 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत स्थापित क्रांती लोकसंचालीत साधन केंद्र कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव या ठिकाणी सप्तश्रृंगी महिला स्वयंम सहाय्यता बचत गटातील श्रीमती बेबीताई सयाजी कानडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अहमदनगर व सेल्को इंडिया व गेम यांच्या संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी कार्यक्रमातील महिलेच्या उद्योग व्यवसाय मध्ये वाढ व्हावी व विजेची बचत व्हावी आर्थिक बचत व्हावी तसेच विजे अभावी काम थांबू नये महिला च्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून 50% मदत सोलर सिस्टिम घेण्यास महिलांना देण्यात आली तसेच उरलेली 50% रक्कम हे SHG बचत गटामधून महिलांनी दिली. त्यानंतर सोलार बेस्ड शिलाई मशीन चे इंस्टॉलेशन करण्यात आले. त्यासाठी दोन महिने सेल्को इंडिया तसेच महाविमं मार्फत अहमदनगर जिल्यामध्ये कोपरगाव, राहुरी व अहमदनगर येथे महिला इंटरप्रेनर यांना मोफत ट्रैनिंग देण्यात आली. जवळ जवळ दोन हजार महिलांनी त्यात सहभाग नोंदवला.प्रथम उदघाटन प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर चे जिल्हा समनवय अधिकारी श्री संजय गर्जे सर बेसिक संस्था श्री महेश बायस व सेल्को इंडिया चे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री गुरुप्रकाश शेट्टी सर तसेच एरिया मॅनेजर महाराष्ट्र श्री संतोष कुमार सर उपस्थित होते.यांनी लाभार्थी सोबत चर्चा करण्यात आली व पाहणी करण्यात आली या साठी सहयोगिनी रोहिणी दंडवते यांनी नियोजन केले व्यवस्थापक सविता परदेशी क्रांती लोकसंचालीत साधन केंद्र कोपरगाव यांनी cmrc च्या कामाची माहिती दिली या वेळी cmrc अध्यक्ष उषा निकम तसेच ,रुपाली संवत्सर सहयोगिनी अलका बढे ,अलका पंङोरे स्वती पगारे व सर्व cmrc स्टाफ समवेत चर्चा करून पुढील नियोजन करणे बाबत dco सर यांनी मार्गदर्शन केले. ह्यावेळी गटातील महिला उपस्थित होत्या व लेखापाल सोनाली शिंदे यांनी क्रांती cmrc कोपरगाव यांनी आभार प्रदर्शन केले.
