

कोपरगाव प्रतिनिधी:-
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पुणे जिल्हा पत्रकार संघ आयोजित पिंपरी चिंचवड येथील कामगार भवनात 19 व 20 नोव्हेंबरला संपन्न होत आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या समारोप कार्यक्रम सन्माननीय उपस्थितीसाठीचे निमंत्रण परिंचे (ता.पुरंदर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी दिले यावेळी पुणे जिल्हा सोशल मीडिया परिषद उपाध्यक्ष राहुल शिंदे , पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रविण नवले , संतोष जंगम, राहुल वाघोले,समीर भुजबळ, छाया नानगुडे ,हनुमंत वाबळे, महावीर भुजबळ, बापूसाहेब मुळीक, शिवदास शितोळे आदीसह पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
