हिंदी व मराठी सिरियल तसेच सिनेमा मधील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या वाढदिवसा निमित्य कोपरगाव येथील गुरू शुक्राचार्य मंदिरास खास भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
हिंदी व मराठी सिरियल तसेच सिनेमा मधील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा वाढ दिवस , आपल्या वाढ दिवस साजरा करण्या साठी व या दिवशी कलेचे गुरू असलेले गुरू शुक्राचार्य यांचे खास दर्शन धेण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्री आज आपल्या गुरू शुक्राचार्य मंदिरात आल्या होत्या , मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा केली , मंदिरातील प्रसन्न वातावरण पाहून त्यांनी मला मंगेशा ची ( मंगेश मंदिर गोवा ) आठवण झाली असे आवर्जून सांगितले . त्यांनी कुठलीही अड काठी न ठेवता किंव्हा कोणताही स्टार डम न दाखविता अगदी मोकळे पणाने मंदिरात पूजा अर्चा केली .


या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट तर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला . या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी , उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे , तसेच संवत्सर चे सरपंच श्री भीमा सेठ , श्री विकास शर्मा , मंदिर व्यवस्थापक श्री राजाराम पावरा , गुरू श्री नरेंद्र जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *