भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते वैद्य रामदास आव्हाड सर यांना आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि 25 फेब्रुवारी शेगाव येथे आयुष मंत्रालय भारत सरकार व अ.भा.आयुर्वेद महासंमेलन आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 च्या उद्घाटन सत्रात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते आदरणीय वैद्य रामदास आव्हाड सर यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.आचार्य देवव्रत जी, मा.श्री.प्रतापरावजी जाधव (राज्यमंत्री आयुष स्वतंत्र प्रभार), इतर मंत्रीगण, आयुष सेक्रेटरी पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा सर ,अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेन्द्रजी त्रिगुणा सर व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी वैद्यगण, व सहा हजाराहून अधिक विद्यार्थी ,डॉ उपस्थित होते.
डॉ.रामदास आव्हाड यांनी आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या 4 दिवसीय आरोग्य मेळाव्यासाठी हजारो वैद्यगण व लाखाहून अधिक सामान्य जन उपस्थित राहणार आहेत. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामयीन आ द्रौपदी मुर्मूजी यांचे शुभहस्ते आजपर्यंतचा सर्वोच्च सन्मान मिळणे हि आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कामाची पावती आहे अशी उस्फुर्त प्रतिक्रिया पुरस्कारार्थी डॉ रामदास आव्हाड यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *